वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

0

 

(Pandharpur)पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या विवाह सोहळ्याची तयारी मंदिर समितीच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा संपन्न होत आहे. यासाठी खास पुणे येथून सुंदर फुले आणली असून देवाच्या विवाह विधिसाठी खास गज विवाह मंडप उभारला आहे.

ऑर्कि , अंथेरियम, सुपारीचे तुरे, जरबेरा, शेवंती अशा विविध फुलांचा वापर करुन देवाचा गाभारा व मंदिराच्या विविध भागांना आकर्षक अशी सुंदर सजावट करण्यात आली आहे. हजारो भाविक सकाळ पासूनच मंदिरात दाखल झाले आहेत. २५ प्रकारची ७ टन फुले वापरून पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी ही सजावट केली आहे.