
(Bid)बीड– मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. बीड शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीडमधील व्यापारी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. बीडमधील बस सेवा सुरळीत आहे.
तर अत्यावश्यक सेवा देखील सुरळीत सुरू राहाव्यात यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. बंद दरम्यान बीडमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरांमध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक उपविभागीय पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक आणि 150 पोलीस कर्मचारी यांच्यासह बीड मधील राखीव पोलीस दल देखील वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी दिली आहे.
Related posts:
धर्मवीर आनंदराव दिघे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी राजेंद्र खांडेकर य...
May 31, 2026Breaking news
पत्रकारिता केवल पेशा नहीं, राष्ट्रहित का दायित्व : पद्मश्री सत्यनारायण नुवाल
May 31, 2026Artical Blog
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog


















