
मुंबई MUMBAI -विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narvekar यांनी १० जानेवारी रोजी दिलेल्या निकालावर आज ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची पत्रकार परिषद होणार असून याला महापत्रकार परिषद असे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेत नार्वेकर यांचे सारे दावे खोडून सत्य समोर आणले जाईल, पुरावे सादर केले जातील, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्याला विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी प्रत्युत्तरही दिले आहे. पत्रकार परिषदा घेऊन वस्तुस्थिती बदलता येत नाही, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेपूर्वी दावे करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनाही आव्हान दिले. पत्रकार परिषद घेण्याची हिंमत कोणीच दाखवली नाही. मोदींनी अशी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
या मुद्यावर बोलताना नार्वेकर म्हणाले की, आमदार अपात्रतेच्या निर्णयात काही नियमबाह्य घडल्याचे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले तरच माझा निर्णय रिव्हर्स होईल अन्यथा नाही, असे नार्वेकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वातील पक्ष खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट केले. याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी उपरोक्त विधान केले आहे. ते म्हणाले की, मी कुणालाही संतुष्ट करण्यासाठी हा निकाल दिला नाही. हा निकाल कायद्याला धरून देण्यात आला आहे.