
(Amravti)अमरावती – वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे तीन दिवसीय भव्य किसान शंकरपटाचे आयोजन केले. आज फायनलच्या दिवशी पुरुषांप्रमाणे तरुणींनीही या स्पर्धेत बैलगाडी सुसाट वेगाने हाकलत उत्साह वाढवला.
अगदी काही सेकंदाचा थरार असलेल्या या बैलगाडी स्पर्धेत हिरीरीने महिलांनी सहभागी होऊन आम्हीही मागे नाही, हे यावेळी दाखवून दिले. पुढील वर्षी स्वतंत्रपणे महिलांची बैलगाडा स्पर्धा आयोजित करू, असं वंचितचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले. बैलगाडीवर बसून हाती दोर घेत तरुणींनी यावेळी मोठ्या उत्साहात बैलजोडी पळवली.