नागपूर (Nagpur) : सध्या नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्याचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शेत पिकांचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अवकाळी पावसाचे वैज्ञानिक दृष्ट्या कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न ,’शंखनाद’ न्यूज चॅनलच्या (Shankhanad news channel )वतीने करण्यात आला.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहानिदेशक मोहन लाल साहू यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. साहू म्हणाले विदर्भ सर्वाधिक तापमानासाठी ओळखला जातो.उन्हाळ्याच्या दिवसात उत्तर- पश्चिम असे राजस्थान (Rajsthan)कडून वारे वाहतात त्यामुळे विदर्भाचे वातावरण तापते.यावेळी पश्चिम भारतात अँटी सायक्लोन तयार झाले आहे. दक्षिण पूर्व वारे बंगालच्या उपसागरातून तर पश्चिमी वारे अरब सागरातून वाहत असल्यामुळे द्रोनिका तयार झाली असल्याने सध्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. वेगवान वाऱ्याच्या अनियमिततामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
यापूर्वी 25 ते 28 एप्रिल पर्यंत येलो, ऑरेंज अलर्ट विदर्भासाठी देण्यात आला होता. त्यामुळेच विदर्भात तसेच मध्य प्रदेश व मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला. आता तो आणखी पाच दिवस,अर्थात 30 एप्रिल म्हणजे महिना अखेरपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती साहू यांनी दिली.