नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करीत असलेले माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी पलटवार (HM Amit Shah on Satyapal Malik) केला. मलिक यांची ही वक्तव्ये आमची साथ सोडल्यावरच काल आली आहेत, सत्तेत असताना त्यांचा अंतरात्मा जागृत का झाला नाही? असे प्रश्न शहांनी उपस्थित केले. मलिक यांच्या विश्वासर्हतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सत्यपाल मलिक यांचा खरा आहे तर मग ते राज्यपाल असताना गप्प का बसले? राज्यपालपदावर असताना त्यांनी या विषयावर बोलायला हवे होते, असेही शहा यांनी त्यांना सुनावले.
अलिकडेच माजी राज्यपाल मलिक यांनी मोदी यांच्यावरही आरोप लावले होते.
पुलवामा हल्ल्यास(Pulwama attack) केंद्र सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचा दावा मलिकांनी केला आहे. त्याचा अमित शहांनी समाचार घेतला. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच जिंकणार असल्याचे शहा म्हणाले. यावेळी त्यांनी दिल्लीती (Kejriwal)केजरीवाल आणि प. बंगालमधील ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee)सरकारवरही निशाणाा साधला.