
अमरावती- आता जे गेले ते का गेले? यावर आपण काय बोलणार ? पण आम्ही आहोत जिथे आहोत, तिथेच आहोत.आम्ही आमच्या विचारधारेसोबत आहोत.आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काँग्रेससोबत राहणार असल्याचा दावा काँग्रेस आमदार ऍड यशोमती ठाकूर यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या वाटेवर असल्याच्या वृत्ताने आज राजकारण तापले. यशोमती ठाकूर यांचेही नाव असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा फेटाळला.