मविआतर्फे भाजपला सद्बुद्धीसाठी दर्शन कॉलनीत यज्ञ

0

नागपूर : रविवारी दर्शन कॉलनी, सद्भावना नगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर या ठिकाणी भाजप आणि क्रीडांगण बचाव समितीच्या वतीने सोमवारी गोमूत्र,गंगाजल शिंपडून शुद्धीकरण कार्यक्रम पार पडला यानंतर महाविकास आघाडी देखील आक्रमक होण्याची चिन्हे असल्याची शक्यता काल वर्तवली गेली. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या परिसरात निर्बुद्ध लोकांना सद्बुद्धी मिळो या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी यज्ञ केला. महाविकास आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्यामुळे भाजपचे धाबे दनानले आहे. शिंदे- फडणवीस सरकार विरोधात लोकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे चित्र या सभेतील गर्दीने दाखवून दिले. मात्र,सत्य स्वीकारण्याऐवजी गोमूत्र, गंगाजल असे प्रयोग करीत भाजपच्या लोकांनी आपली मानसिक दिवाळखोरी स्पष्ट केली असा आरोप या निमित्ताने करण्यात आला. विजय वनवे, हरीश रामटेके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी दिलीप तुपकर,महेंद्र कटाने,महेश ठाकरे,चंदू वनवे,आशीष बडनखे,भास्कर कायरकर,राजू अदमाने,प्रशांत तिडके,मोहन विश्वकर्मा,प्रशांत ढोक,सतीश भूरे,भैय्या शरणागत,राजेश बंडाबुचे,प्रवीण बुर्ले,सुभाष गायकवाड,हरिभाऊ बनायेथ,प्रदीप धोटे,बाला साखरकर
मनोज राने आदी कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते.