नागपूर ; काटोल तालुक्यातील ढिवरवाडी येथे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असतांना सिट्रस ईस्ट्रेटला मंजुरी मिळाली होती. तब्बल १२ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे संत्रा वर्गीय रोपे मिळावे हा यामागचा उदेश आहे. येथील विकास कामाला चालणा मिळण्यासाठी या अगोदर १ कोटी ५ लाख देण्यात आले होते. आता परत २ कोटी ४३ लाख मिळाले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
संत्रा व मोसंबी उत्पादकांना चांगला दर्जाची संत्रा वर्गीय रोपे मिळावी. शिवाय नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी त्यांना प्ररिक्षण देणे. माफक दरात संत्रा व मोसंबी उत्पादनासाठी लागणारे साहीत्य उपलब्ध करुन देणे. तसेच संत्रा व मोसंबीला विदेशात निर्यात करण्याच्या दुष्टीकोणातुन प्रयत्न करण्यासाठी हा सिट्रस ईस्टेटची स्थापना करण्यात आली आहे. ढिवरवाढी येथे जवळपास ३४ एकर असलेल्या या जागेत सुरुवातीला १० एकर जागा ही सिस्ट्रस ईस्टेटला देण्यात आली होती. परंतु विकास आराखडा तयार केल्यानंतर परत जागेची आवश्यकता असल्याने ४ एकर जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी सुध्दा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मागर्दशन करण्यासाठी तंज्ञ मंडळीचे मार्गदशन शिबीर सुध्दा लवकरच घेण्यात येणार असल्याचेही सलील देशमुख यांनी सांगितले.
जवळपास १२ कोटी रुपये या प्रकल्पाची किंमत असून आतापर्यत ३ कोटी ३८ लाख मिळाले आहे. या अगदोर मिळालेल्या १ कोटी ५ लाख रुपयातुन संत्रा व मोसंबी बागांच्या मशागतीसाठी जे यंत्र लागतात त्यांचीखरेदी करण्यात आली. ते उत्पादकांना माफक दरात किरायाणे देण्यात येते असून मोठया प्रमाणात शेतकरी याचा वापर करीत आहे. याचा फायदा सुध्दा संत्रा व मोसंबी उत्पदकांना होतांना दिसत आहे. आता नव्याने जे २ कोटी ४३ लाख देण्यात आले आहे त्यात प्रामुख्याने प्रकाशकीय इमारत बांधकाम, रोपवाटीकेचा विकास, औजार बँक ची निर्मीती करण्यासोबत शेतकऱ्यांना परिक्षण देण्यासाठी ३ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.
मध्य भारतातील पहिली प्रयोगशाळा डिसेंबर पर्यत
पानाची तपासणी करुन झाडावर कोणता रोग आहे किंवा कोणत्या अन्नद्रव्याची कमी आहे याचा तपास करण्यासाठीची प्रयोगशाळा या सिट्रस ईस्टेट मध्ये निर्माण होणार आहे. अत्यांधुनीक पध्दतीची वापर करुन ही प्रयोगशाळा असणार आहे. मध्य भारतातील ही पहिलीच प्रयोगशाळा असून त्याच्या डिसेंबर पासून ही सुरू होणार आहे. याच प्रयोगशाळेतच पाणी व माती परीक्षण सुद्धा होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संत्रा व मोसंबी उत्पादकाने केलास त्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असेही सलील देशमुख यांनी सांगितले.