Home Artical Blog वायसीसीईच्‍या चमूने पटकावले ‘फार्मूला कार्टिंग रेस’चे विजेतेपद

वायसीसीईच्‍या चमूने पटकावले ‘फार्मूला कार्टिंग रेस’चे विजेतेपद

0

नागपूर, 25 मार्च 2026 :- यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (वायसीसीई) च्‍या टीम हॉक्‍सने कोइम्‍बतूर येथील येथे नुकत्‍याच पार पडलेल्‍या प्रतिष्ठेच्‍या फॉर्मूला कार्टिंग रेसिंग चॅम्पि‍यनशिप (एफकेआरसी) 2026 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

अकॅडेमी ऑफ इंडिजेनियस मोटरस्‍पोर्ट्सच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील अग्रगण्य संस्थांच्या 39 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत गो-कार्ट आणि इ-कार्ट अशा दोन प्रमुख गटांमध्ये ही स्पर्धा झाली.
टीम हॉक्‍समधील गो-कार्ट गटात चालक हृषिकेश राज आणि हर्ष बाली यांना अनुक्रमे बेस्‍ट ड्रायव्‍हर आणि फास्‍टेस्‍ट लॅप सेटर किताब पटकावला तर या संघाने इंड्यूरन्‍स विनर अवॉर्डसह रोख पारितोषिकही जिंकले. इ-कार्ट गटात चालक विनय मोहिते आणि ओजस गोडे यांनी बेस्‍ट इनोव्‍हेशन, बेस्‍ट ऑस्थेटिक आणि बेस्‍ट कॉस्‍ट ऑप्टिमम पुरस्‍कार पटकावला. सर्व स्पर्धांमधील एकूण उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे टीम हॉक्‍सला एफकेआरसीचा विजेता म्‍हणून घोषित करण्‍यात आले व त्यांना ट्रॉफी आणि ₹1,00,000 चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या टीमचे नेतृत्व कॅप्टन हर्ष बाली यांनी केले. मेकॅनिकल इंजिनियरींग, इलेक्‍टॉनिक्‍स अँड टेलेकम्‍युनिकेशन इंजिनीयरींग तसेच इतर शाखांतील 24 विद्याथी या स्‍पर्धेत सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. यू. पी. वाघे आणि एलवायएसएस व्यवस्थापन, प्रा. डॉ. राजेश जी. बोडखे (फॅकल्‍टी अडव्हायजर) आणि विभागप्रमुख डॉ. जयंत पी. गिरी यांनी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले.