उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या

0

छत्रपती संभाजीनगर (Chatrapti Sambhajinagar)- छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर परिसरातील बालाजी नगर येथे एका लघु उद्योजकाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सचिन साहेबराव नरोडे वय ३८ असे मृतकाचे नाव असून. रा. बालाजी नगर क्रांती नगर साजापूर गट नंबर येथे हा व्यक्ती वास्तव्यास होता. मूळ गाव शिलेगाव गंगापूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार साजापूर बालाजी नगर येथे नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाइपलाईनचे काम सुरु होते. कामाची पाहणी करत होते, लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात झाली.

घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलिस उपायुक्त महेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रविण पाथरकर, अशोक इंगोले, यांचासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ही हत्या का झाली ? आणि कोणी केली? याचा पोलीस शोध घेत आहेत.