नागपूर (Nagpur) :- लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा कमी व्हायला नको. पॉईंट एकवर माणसाचा जन्म होत नाही. त्यामुळे एका दाम्पत्याला दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्य असावेत, तरच भविष्यात लोकसंख्येचा समतोल राखला जाईल, असे महत्त्वाचे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.
रविवार(१ डिसेंबर) रोजी बीआरए मुंडले शाळेच्या प्लॅटिनम ज्युबिली हॉल येथे आयोजित कठाळे कुल संमेलनात ते बोलत होते. या संमेलनात मोहन भागवत यांच्या आधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींनी सध्या अनेक तरुण दांपत्य एकही अपत्य जन्माला घालण्यास तयार नाही, असा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. त्याच मुद्द्याला पुढे घेऊन जात सरसंघचालकांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. यावेळी मोहन भागवत म्हणाले, लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचे दर २.१ पेक्षा खाली नको. नक्कीच सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या वाढीचे दर २.१ पेक्षा खाली गेले, तर तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कोणी नष्ट करत नाही,तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहे. आपल्या देशाची लोकसंख्या नीती वर्ष २०००च्या जवळपास ठरली. त्यातही हेच सांगण्यात आले की लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा खाली राहू नये.
आता पॉईंट एकवर तर माणूस जन्माला जात नाही. मग जर २.१ एवढे लोकसंख्या वाढीचे दर पाहिजे, तर अपत्य दोन पेक्षा जास्त पाहिजे. याचा अर्थ कमीत कमी तीन पाहिजे. कुलनीती चालली पाहिजे त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढी कडे जाते. आपली संस्कृती टिकविली जाते. माणसाचा स्वभाव मिळविणारा असला पाहिजे. पण त्यासोबत वाटणाऱ्यांचा सुद्धा असला पाहिजे कारण वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. माणसाचा स्वभाव असतो आणि समाजाची संस्कृती असते. महिलेच महत्व आपल्या संस्कृतीत मातेचं असतं, पाश्चात्य संस्कृतीत पत्नीच असते. धन माणसाजवळ असावं पण ते आवश्यकतेपेक्षा जास्त असून नये, असे सरसंघचालक (Mohan Bhagwat) म्हणाले. आपल्याकडे मजबूत व्यवस्था
घरात लागलेले वळण फार महत्त्वाचे असत कारण ते परंपरेने चालत आलेला असत. पाश्चात संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे त्यांच्या कडे सुद्धा संस्कृती होती. पण त्यांनी आता त्याचा विसर पडला आहे. मात्र आपल्याकडे संस्कृती अजून जपली जात आहे. घरातील लहान लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते. आपल्याकडील ही व्यवस्था फार मजबूत आहे. कुटुंबापासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते, असे भागवत म्हणाले.