नागपूर (Nagpur) :- श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे शिकणाऱ्या एकूण 65 आदिवासी विद्यार्थिनींना केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅक सूट वाटप करण्यात आले. नितीन गडकरी यांच्या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणून केली. शिक्षणाबरोबर खेळातही प्रगती करण्यासाठी गडकरी यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.
या सर्व विद्यार्थ्यांनी खो-खो व अॅथलेटिक्स हे खेळ खेळत असून मनीषा मडावी हिने मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत भारतीय संघात सहभाग नोंदविला होता. पाच विद्यार्थिनींची नागपूर विद्यापीठाच्या खो-खो संघात निवड झालेली आहे. आतापर्यंत 14 विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड देखील झालेली आहे तसेच अनेक राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेच्या खो-खो संघाने सहभाग नोंदविला आहे. या सर्व विद्यार्थिनींना (Nitin Gadkari) अश्फाक शेख व महिला महाविद्यालयाचे प्राचार्य पराग बनसोले हे मार्गदर्शन करतात.
याप्रसंगी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रवींद्र फडणवीस, सीमा फडणवीस हिंदू मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे, उपमुख्याध्यापक सुबोध आष्टीकर, क्रीडा शिक्षक अश्फाक शेख, केअरटेकर मंगेश देशमुख, छत्रपती युवक क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेश तुमसरे तसेच पंकज बोकडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अश्फाक शेख यांनी केले.