अमित शहा आजपासून मुंबई दौऱ्यावर,

0

मुंबईः (mumbai)केंद्रीय गृहमंत्री (amit shah)अमित शहा यांचे आज सायंकाळी मुंबईत आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर (HM Amit Shah on Mumbai Tour) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला अमित शहा हजेरी लावणार आहे. निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी मुंबईत दाखल होताच अमित शहा हे सह्याद्री अतिथीगृहात(eknath shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (devendra fadnavis)देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागण्याची अपेक्षा असताना तसेच राज्यात विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला सुरुवात झाली असताना भाजप व शिंदे गटाच्या डावपेंचावर यावेळी चर्चा अपेक्षित आहे.

संपूर्ण राज्याचे व देशाचेही लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आहे. या निकालाच्या शक्यतेबाबत परस्पर दावे केले जात आहेत. त्यामुळे निकाल कुठलाही आला तरी काय करायचे, याच्या डावपेचावर अमित शहा भाजप व शिंदे गटाच्या नेत्यांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही पक्षाला बरेच डॅमेज कंट्रोल करावे लागत आहे. त्यावरही अमित शहा काही नेत्यांना मार्गदर्शन करू शकतात, अशी शक्यता दिसत आहे. अमित शहांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने विरोधकांमधील काही नेत्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. काही नेते भाजपमध्ये येण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी अमित शहा हे महाराष्ट्रभूषण सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.