“मविआत १३ जागांवर एकमत नाही..”

0

सोलापूर SOLAPUR -महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटप ठरलेले नाही. त्यामागील खरे कारण पुढे आले आहे. अनेक लोकसभा मतदारसंघांबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत नसल्याचे पुढे आहे. दरम्यान, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार SHRAD PAWAR  यांनी या मुद्यावर भाष्य केले आहे. पवार यांनी सांगितले की, “महाविकास आघाडीतील घटकपक्षांत राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ३५ जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित १३ जागांवर चर्चा सुरू आहे. त्यावरही लवकरच तोडगा काढला जाईल”, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सोलापुरात बोलताना दिली.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील करून घेणार का ? यावर ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत बोलणे झाले आहे. सरकारकडून ईडीसह सरकारी यंत्रणाचा दुरुपोयग होत असल्याचा आरोप पवारांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला. पवार म्हणाले, अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरूंगात टाकले. पण, न्यायालयाने आरोपपत्र पाहून मुक्तता केली. ईडीचा वापर हे सरकारचे हत्यार आहे. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. रोहित पवारांना एकट्याला नाही. तर सर्वच नेत्यांना ईडीचा धाक दाखवला जात आहे. पण आम्ही शांत बसणार नाही. आम्ही न्यायालयातील लढू, असा इशाराही शरद पवारांनी दिला.