‘राष्ट्रवादी’ वरील सुनावणीचे नवे वेळापत्रक

0

मुंबई : शिवसेनेवरील सुनावणी आटोपल्यावर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि अपात्रता याचिकेवर निर्णय घ्यावा लागणार आहे. नार्वेकर यांच्याकडून शनिवारी सुनावणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही गटाची संमती घेवून विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानभवनातील शनिवारची सुनावणी संपली असून आज आज नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. २३, २४ जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी होणार आहे. २५ जानेवारीला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. २९ आणि ३० जानेवारीला दोन्ही गट आपली अंतिम बाजू मांडणार आहे. ३१ जानेवारील सुनावणी पूर्ण होईल आणि त्यानंतर ८ ते १० दिवसात अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
यासंदर्भात बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार मला सगळ्यांचे म्हणणे ३१ जानेवारीपर्यंत ऐकून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर माझा निर्णय मी देईल. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.