पक्षांमधील तणावतही देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंचा एकत्रच विधान भवनात प्रवेश!

0

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असून विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारत एकत्रित प्रवेश केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि मविआ सरकार कोसळल्यावर भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात (DCM Devendra Fadnavis & Uddhav Thackeray in Friendly Mood) प्रचंड कटुता आली असताना या दोन्ही पक्षांचे वरीष्ठ नेते हसत खेळत गप्पा मारत असल्याचे चित्र दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधिमंडळाचे कामकाज सुरू होत असताना या दोघांनी एकत्रच हसत हसत विधानभवनात प्रवेश केला. कटुता कमी करण्याचे प्रयत्न या दोन्ही पक्षांकडून सुरु आहेत की काय, अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे.

शिवसेनेतल्या बंडापासून आज पहिल्यांदाच हे दोन नेते एकत्र दिसले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्रच विधानभवनात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते दानवे हे देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेते एकमेकांना काहीतरी सांगत असल्याच दृष्ट दिसून आले. दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. सभागृहातही फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्या विवाहाच्या मुद्यावर केलेले भाष्य दोन्ही पक्षांमधील तणाव कमी करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे मानले गेले. शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजही विविध मुद्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरले आहे. शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव देखील येणार आहे.

 

https://youtu.be/t9VVXCToAF0