Home Top News आशीष देशमुखांचे काँग्रेसमधून अखेर निलंबन

आशीष देशमुखांचे काँग्रेसमधून अखेर निलंबन

0

Nagpur नागपूर : काँग्रेसच्या  ( congress ) नेतृत्वावर सातत्याने टीका करणारे नेते आशीष देशमुख यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केल्याची माहिती (Ashish Deshmukh suspended from Congress)आहे. पक्षाने त्यांना ५ एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसात स्पष्टीकरण मागविले होते. देशमुख यांनी अलिकडेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ( NANA PATOLE )नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. मोदी आडनावावरून न्यायालयाने शिक्षा केल्यावर राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याचवेळी आशीष देशमुख हे फार काळ काँग्रेसमध्ये टिकणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या शिस्तभंग कारवाई समितीने त्यांना ५ एप्रिल रोजी नोटीस बजावली होती.

या नोटीसीत समितीने आशीष देशमुख यांनी राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला होता. सातत्याने पक्ष नेतृत्वावर टिका केल्याबद्धल पक्षातून निलंबित का करण्यात येऊ नये, याचे तीन दिवसात उत्तर देण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते. आशिष देशमुख हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुळचे काँग्रेस विचारांचे असलेल्या देशमुखांनी काही वर्षांपूर्वी भाजपही जवळ केला होता. भाजपच्या वतीने ते काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले होते. मात्र, नेत्यांशी बिनसल्याने त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता.