अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीची गरज नाहीच”: शरद पवार

0

मुंबई : अदानी ग्रुपमधील कथित घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी घेऊन काँग्रेससह विरोधी पक्ष आंदोलनात उतरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच योग्य राहील, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी (Sharad Pawar On Adani Issue) शनिवारी पत्रकार परिषदेत (Press conference)मांडले. पवार इतक्यावरच थांबलेले नाहीत तर त्यांनी एक प्रकार अदानी यांची पाठराखणही केली. हिंडेनबर्ग कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय? हे मला माहितीही नाही. मात्र, एक परदेशातील कंपनी काही तरी अहवाल बनवते व त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो, हे योग्य नाही. अशा अहवालाकडे किती लक्ष द्यायचे, याचाही विचार केला पाहीजे, असे स्पष्ट करताना एखाद्या संस्थेने आपल्या देशातील उद्योगाबद्दल सांगण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने त्याविषयी सांगणे अधिक योग्य व विश्वासार्ह आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांच्या भूमिकेमुळे आता विरोधकांच्या एकजुटीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.
शरद पवार यांनी काल शुक्रवारी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा हे मत मांडले होते. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अदानी प्रकरणी आपली वेगळी भूमिका मांडली. पवार म्हणाले, जेपीसीमध्ये(lok sabha) लोकसभा व राज्यसभेत जो सर्वात मोठा पक्ष आहे, त्याच्याच खासदारांची संख्या अधिक असते. अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता जेपीसी बनवलीच तर त्यात भाजपचे 15 खासदार असतील. उर्वरित 6 ते 7 खासदार विरोधी पक्षातील असतील. ज्या जेपीसीत विरोधकांची संख्या एवढी कमी आणि सत्ताधाऱ्यांची संख्या अधिक असेल, अशा समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित करायला वाव आहे. त्यामुळे त्याऐवजी सर्वोच्च न्यायालयानेच या घोटाळ्याची चौकशी करणे उपयुक्त राहील.

 

अदानींचे कौतूक

आपली भूमिका स्पष्ट करताना पवारांनी अदानींचे कौतूकही केले.( maharashtra)महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडूनच मिळते. मी अदानींचे कौतुक करत नाही. मात्र, अदानींचे योगदान मान्य करावे लागेल. पूर्वी (Tata-Ambani)टाटा-अंबानींचे नाव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली जायची. मात्र, नंतर टाटांचे देशासाठी मोठे योगदान आहे, याची जाणीव झाल्यानंतर तशी टीका करणे बंद झाले. आता अदानींचे नाव घेऊन त्याप्रमाणेच टीका केली जात आहे. मात्र, अदानींचेही काही तरी योगदान आहे, हे मान्य करावे लागेल, असे पवार म्हणाले.
अदानींच्या कंपनीत गुंतवणूक झालेले 20 हजार कोटी रुपये कोणाचे? या (rahul gandhi) राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी (LIC)एलआयसी व 20 हजार कोटींबाबतची माहिती माझ्याकडे नसल्याने त्यावर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. अदानींवर चर्चा करण्याऐवढा हा मोठा विषय आहे का?, याचाही विचार केला पाहीजे. देशात सध्या बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या समस्या या तीन प्रमुख समस्या आहेत. यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे पवारांनी सांगितले.

 

चिकन साते विथ पीनट सॉस आणि मोतीचुर रबडी पर्फेत|Chicken Satay With PeanutSauce|Motichur Rabdi parphet