शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव, फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष घेतले वेधून

0

 

अहमदनगर – श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डी येथे साई मंदिरात अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व वैद्यकिय संचालक ले.कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सव उत्साही वातावरणात सुरु आहे. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या विद्युत रोषणाई व फुलांच्‍या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधले.

 

साई मंदिरात भव्य रांगोळी

शिर्डी – आज गुरू पौर्णिमेनिमित्त साई मंदिर येथे हजारो भाविक भक्त साईंना नतमस्तक झाले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना गुरु दक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मोठ्या संख्येने भक्त साईंच्या चरणी नतमस्तक झाले. काहींनी आपल्याला जे काही मिळाले, त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रसादाचे वाटप केले. यावेळी साई मंदिरामध्ये भव्य रांगोळी सुद्धा रेखाटली गेली.