ग्रामीण भागात पेरणीला सुरुवात

0

 

गोंदिया- गोंदिया जिल्ह्यात तीन चार दिवस अगोदर पावसाने जोरदार हजेरी लावली. आता शेतकरी शेतीच्या कामाकडे वळला असून शेतीची मशागत करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये पेरणीची कामे सुरू केली आहेत. जिल्ह्यात जमिनीचा कस पाहून धान पिकाची पेरणी ही शेतकरी करीत असतात. शेतात 120 दिवसात येणारे धान आणि 150 दिवसानंतर येणारे धान हे शेतकरी जमीनीचा कस आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपल्या शेतामध्ये लावत असतानाचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. त्याचबरोबर यावर्षी मशागती आणि पेरणीला उशीर झाल्यामुळे धान पीक हे दिवाळीनंतर येण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे आणि त्यानुसारच धान विक्री करण्यात येईल असे शेतकरी सांगत आहेत.