पुणे (Pune) : ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यात ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ अशी बॅनरबाजी पवार समर्थकांकडून सुरु आहे. आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे वक्तव्य अजित पवारांनी शुक्रवारी (NCP Leader Ajit Pawar) केले होते. त्यानंतरच अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. पुण्यातील कोथरूडमध्ये हे बॅनर्स झळकल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार अशी स्लोगन या बॅनरवर झळकत आहे.
एका दैनिकाच्या वतीने पुण्यात आयोजित प्रकट मुलाखतीत अजित पवार यांनी “भविष्यात आपण सत्तेसाठी (Congress)काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही,’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत. पवार म्हणाले, राष्ट्रवादीला (NCP) उपमुख्यमंत्रिपदाचे आकर्षण नाही. मुख्यमंत्रिपदावर मात्र आम्ही 2024 मध्येच काय, आजही दावा करू शकतो. आधी आपण ‘सेक्युलर’बाबत बोलत होतो. पण 2019 मध्ये(Shivsena) शिवसेना, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांनी सगळ्यांना फाटा देत सरकार आणले. तेव्हा काही मुद्दे बाजूला ठेवले होते. (BJP)भाजपशी युतीसाठी दबाव नसल्याचे स्पष्ट करून अजित पवार म्हणाले, संधी आल्यास अशावेळी सेक्युलरिझमचा अडसर ठरणार नाही.
गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीची राज्यात मोठी चर्चा होती. ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सर्वत्र पसरल्यावर अजित पवार यांनी आपण शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबत राहणार असून पक्षाचा कुठलाही निर्णय आपल्याला मान्य असेल, असे स्पष्ट केले होते.