ठाणे -अजित पवार यांचे महायुती मध्ये स्वागत करू , पवारांना मानपान देण्याचा प्रयत्न इथे होईल अजित पवार हे जर आताच्या सरकार मध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे. महाराष्ट्रामध्ये एकतर्फी शिवसेना आणि भाजपचे सरकार हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. काहीजण बातमी पेरण्याचे काम करत आहेत.
जो न्यायालयाचा निकाल आहे तो सत्याच्या बाजूनेच येणार आहे.
आमची बाजू सत्य आहे,उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.त्यांच्या विरोधात कोणी मतदान केले नव्हते. त्यामुळे न्यायालयाचा निकाल निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने आला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल पण आमच्या बाजूने लागेल.
१६ आमदार अपात्र होणार नाहीत. ज्या माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला आणि कार्यकर्त्यांसाठी झटत राहिला. त्यांना सभेमध्ये भाषण करू दिले गेले नाही. नक्कीच त्यांची कुचंबना होत आहे. त्यामुळे ते हा निर्णय घेतील, त्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. पक्षनेतृत्वामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन ही गोष्ट होईल .
हेल्पिंग हॅण्ड मिळाल्याने महाराष्ट्रामध्ये काम वाढेल आणि काम करणारे सरकार आणखी मजबूत होईल