तांदळाच्या दरात वाढ

0

 

मुंबई (Mumbai)– गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात विविध प्रकारचे तांदूळ येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा प्रत्येक किलो तांदळामागे 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. साठवणुकीच्या दृष्टीने ग्राहक देखील पाठ फिरवत असल्याने व्यापाऱ्यांना घाम फुटला. मागच्यावर्षी 50 रुपये किलोने मिळणारे तांदूळ आता 65-68 किलोने मिळत आहेत.

त्यामुळे कोणते तांदुळ खरेदी करायचे? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. तसेच संपूर्ण नवा तांदूळ हा एप्रिलमध्ये दाखल होईल, तर कोलम तांदळाच्या दरात वाढ झाली असून, बासमती तांदळाचे दर नियंत्रणात आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.