‘जस्टा काॅजा’ राष्ट्रीय कायदा महोत्सवाचा समारोप

0

 

-डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजन

नागपूर (Nagpur)-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात आयोजित ‘जस्टा काॅजा’ या राष्ट्रीय कायदा महोत्सवाचा समारोप नुकताच पार पडला. तीन दिवस चाललेल्या राष्ट्रीय कायदा महोत्सवात देशाच्या विविध संस्था विद्यापीठातून सहभागी पासून प्रतिनिधींनी विधी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली.

समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश न्यायमुर्ती भरत देशपांडे,  रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
हरेराम त्रिपाठी, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, समन्वयक डॉ. प्रवीणा खोब्रागडे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी यांनी मार्गदर्शन करताना कायद्याची उत्पत्ती आणि उत्क्रांती याबाबत माहिती दिली. रेखाचित्र, प्राचीन ग्रंथ आणि ऐतिहासिक व्यक्तींपासून प्रेरणा घेण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

कोअर कमिटीचे आयुष आओले यांनी मनापासून आभार मानले.प्राचार्य डॉ. रविशंकर मोर यांनी विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले.