वळसे पाटलांना घरातच पाय घसरुन पडल्याने दुखापत

0

Dilip Walse Patil Injured foot falling in house

* पुण्यातील रुग्णालयात दाखल

पुणे (Pune), २८ मार्च  : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांना घरातच पाय घसरुन पडल्यानं त्यांना दुखापत झाली आहे. वळसे पाटील यांच्या खुब्याला मार आणि हात फ्रॅक्चर झाला आहे. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. याच रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

वळसे पाटील यांनी स्वतः ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.

शिरुर लोकसभा मतदार संघातून आढळराव पाटलांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी वळसे पाटील देखील उपस्थित होते. या मतदार संघाची वळसे पाटलांवर मोठी जबाबदारी आहे. शिवाय अमोल कोल्हेंना पराभूत करण्यासाठी अजित पवार गटातील नेत्यांनी शिरुरकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र याच काळात आता वळसे पाटलांवर अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.