संजय राठोडांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा : नाना पटोले

0

मुंबई :(MUMBAI) अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातूनच पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत संजय राठोड यांच्यावरील आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संजय राठोड यांच्या कार्यालयातील पीएस आणि ओएसडी अधिकारी मोठ्या रकमेची मागणी करतात, हा महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट व केमिस्ट संघटनेचा आरोप भ्रष्टाचार कुठवर गेला आहे याचे उत्तम उदाहरण आहे. मंत्रालायातूनच पैसे मागितले जात आहेत हे चिंताजनक आहे, असे पटोले म्हणाले.
संजय राठोड यांच्यावर याआधी जमीन घोटाळ्याचा आरोप होता पण त्याचीही चौकशी झाली नाही. कृषी मंत्री (Abdul Sattar)अब्दुल सत्तार यांच्यावरही गायरान जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. अब्दुल सत्तार यांनी वाशिम मधील १५० कोटी रुपये किंमतीची ३७ एकर गायरान जमीन परस्पर एका खाजगी व्यक्तीला दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालू नये, असे पटोले म्हणाले.

नागपुरातही घोटाळ्याचे आरोप

मुख्यमंत्री(EKNATH SHINDE) एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील ५ एकर सरकारी जमीन १६ बिल्डर्संना कमी दरात भाडेतत्वावर दिली होती. ही जमीन झोपड पट्टीवासीयांसाठी घरे बांधण्यासाठी होती. मात्र, ती काही खासगी विकासकांना देण्यात आली. या जमिनीची मालिकी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टकडे (NIT) आहे. बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत ही ८३ कोटींहून अधिक असताना केवळ २ कोटींहून कमी किंमतीला ही जमीन १६ जणांना भाडेतत्वावर देऊन मोठा घोटाळा करण्यात आला परंतु यावरही कारवाई झाली नाही, आरोपही पटोले यांनी केला..

 

अंडा रेशमी पराठा आणि डेलगोना कॉफी | Egg Reshmi Paratha Recipe | Dalgona Coffee Recipe | Ep- 114 |