क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे आयोजन
नागपूर. (NAGPUR) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj of Nagpur University) शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू (Chhatrapati Award winning player ) प्रवीण वहाले, आलोक पांडे, भूषण गोमासे, डॉ. सौरभ मोहोड यांचा गुरुवारी समारंभपूर्वीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. दीपक कवीश्वर, विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटील, विद्यापीठाचे बॅरिस्टर शेषराव वानखेडे शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विद्या भारंबे, महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचे सचिव डॉ. अमरकांत चकोले, आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी महासचिव डॉ. अशोक पाटील, अरुणराव कलोडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जंगितवार, आयडीसीपीई महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शारदा नायडू, माधवी मार्डीकर, डॉ. अंबाडकर आदी उपस्थित होते.
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आंतर महाविद्यालयीन आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठ क्रीडा परिसरात या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा देखील सत्कार करण्यात आला. डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालयाने पुरुष व महिला गटात आंतर महाविद्यालयीन आट्यापाट्या स्पर्धा जिंकली. प्रमुख अतिथींच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
आयडीसीपीई (IDCPE)महाविद्यालय उपविजेते ठरले. डीएनसी (DNC)महाविद्यालय नागपूर तृतीय तर विद्यापीठाचे बॅरिस्टर एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयाने चौथे स्थान प्राप्त केले. महिला गटात डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालयाने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. आयडीसीपीई महाविद्यालय उपविजेते ठरले. तृतीय स्थान विद्यापीठाचे बॅरिस्टर एस. के. वानखेडे शिक्षण महाविद्यालयाने तर चतुर्थ स्थान दयानंद आर्या कन्या महाविद्यालयाने पटकावले. कार्यक्रमात ट्रॉफी स्पॉन्सर्ड करणारे संतोष भगत यांचा सत्कार करण्यात आला. टूर्नामेंट इन्चार्ज म्हणून डॉ. सौरभ मोहोड, अंकुश घाटे, डॉ. सुयश पंडागडे, प्रमोद नेती, प्रांकित बनसोड, सागर कैकाडे, प्रतीक कोटांगळे, चिराग बोरकर, तक्षशिला मेश्राम यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.