जरांगेंना अद्याप आझाद मैदानासाठी परवानगी नाही

0

मुंबई-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीला चलो मुंबईची घोषणा केली असली तरी त्यांना मुंबईतील आझाद मैदानाची परवानगी देण्यात आलेली नाही. मैदानात आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजांकडून पोलिसांशी पत्र व्यवहार करण्यात आला होता. मात्र, आंदोनाला काहीच तास शिल्लक असतानाही पोलिसांकडून कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. उद्यापासून सुरू होणारे आंदोलन २६ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानात पोहोचेल, अशी घोषणा करण्यात आलीय.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २० जानेवारीपर्यंतची मुदत दिलीय. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे पाटील २० जानेवारीला मुंबईच्या घोषणेवर ठाम असल्याचे दिसून आले. २० तारखेपर्यंत ५४ लाख कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती.

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live