२२ ला राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर!

0

 

मुंबई-आयोध्येत प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातही सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती आहे. राज्य सरकारने आजच यासंदर्भात निर्णय घेतला असून त्यानुसार सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा देशात दिवाळीप्रमाणे साजरा व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे देशभरात कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. देशातील नागरिकांना प्रतिष्ठापनेचा सोहळा बघता यावा, यासाठी अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता महाराष्ट्राने देखील निर्णय घेतला आहे.२२ राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, हरियाणा, गोवा आणि आता महाराष्ट्र सरकारने देखील या सोहळ्यासाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. काही राज्यांनी अर्धा दिवस सुटी जाहीर केली आहे. तर कालच केंद्र सरकारने केंद्रीय आस्थापनांसाठी अर्धा दिवसाची सुटी जाहीर केली आहे.

बिहारी स्टाइल धमाकेदार चिकन | Shankhnaad News #shankhnaadnews #live