नेते,पदाधिकारी जाणार बूथ अध्यक्षांच्या घरी ! -भाजपचे महानगरात बूथ चलो अभियान

0

नागपूर – देशाच्या अंतिम घटक,तळागळातील माणसाला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनाचा लाभ मिळावा, मतदार यादी प्रमाणे कुणाची नावे सुटली तर नाही ना ते चेक करणे,बूथ अंतर्गत राहणारे काही विशिष्ठ लोक,वरिष्ठ,महिला,युवा लोकांची भेट घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महानगरात नेते,पदाधिकारी बूथ अध्यक्षांच्या घरी एक दिवस मुक्कामाला जाणार आहेत. यासोबतच ‘ फिर एक बार मोदी सरकार….’अशा भिंती ही नेतेमंडळी, पदाधि कारी रंगविणार आहेत. 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान राबविल्या जाणाऱ्या या अभियानात एक प्रवासी कार्यकर्ता बूथचा प्रवास करेल आणि 18 विषयांची माहिती गोळा करेल अशी माहिती महानगर भाजप अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली. एका बूथमध्ये 900 ते 1100 मतदाता असतात. त्यांची प्रत्यक्ष भेट, बूथ अंतर्गत धार्मिक स्थळे,पदाधिकारी भेट, शासनाकडून झालेली मदत, अडचणी दूर करणे त्या प्रवासी कार्यकर्त्यावर प्रमुख जवाबदारी असेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य नागपूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पूर्व नागपुरात या अभियानात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रवक्ते चंदन गोस्वामी, राम आंबुलकर,संदीप गवई,अश्विनी जीचकार, भोजराज डुंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. महापुरुषांचा अपमान, दिला इशारा दरम्यान, विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळणाऱ्या तसेच जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करा अन्यथा आमच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल, जिल्हा परिषदेत उद्या सोमवारी ठिय्या आंदोलन केले जाईल, कामकाज होऊ दिले जाणार नाही. महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असा विद्यापीठात कुलगुरूंना आम्ही इशारा दिला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

नाश्त्यात झटपट बनवा बाजरीची लापशी | Shankhnaad News #shankhnaadnews #live