विदर्भ साहित्य संघातर्फे मनोहर म्हैसाळकर स्मृती एकांकिका महोत्सव 31 जुलै पासून

0

– नाशिक आणि ठाणे येथील तीन एकांकिकांचे सादरीकरण
नागपूर दिनांक, 30 जुलै
विदर्भ साहित्य संघाचे दिवंगत अध्यक्ष कै.मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेने दिनांक ३१ जुलै आणि १ ऑगस्ट दोन दिवशी एकांकिका महोत्सवाचे आयोजन केले आहे.लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सोसायटीच्या नाट्यगृहात तीन एकांकिका सादर होतील.
नाशिक येथील ‘सोशल नेटवर्किंग फोरम ‘ यासंस्थेने निर्मिलेल्या ‘ हंडाभर चांदण्या ‘ आणि ‘तो राजहंस एक ‘ तसेच ‘ ठाणे आर्ट गिल्ड आणि नाट्यगंध ‘ निर्मित ‘ प्रस्थान उर्फ एग्झिट ‘ या तीन एकांकिकांचे सादरीकरण या महोत्सवात होईल. दिनांक ३१ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘ हंडाभर चांदण्या ‘ आणि ७. ३० वाजता ‘ तो राजहंस एक ‘ या एकांकिका होतील . दिनांक १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६. ०० वाजता ‘ प्रस्थान उर्फ एग्झिट ‘ ही एकांकिका सादर होईल. या  एकांकिकांना झी सन्मान ,मटा सन्मान असे अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत.
नाशिक येथील एकांकिकांचे लेखक दत्ता पाटील असून दिग्दर्शक सचिन शिंदे आहेत .’ हंडाभर चांदण्या ‘ ही एकांकिका दुष्काळी गावातील पाण्याच्या समस्येची मांडणी करणारीअसून ,’ तो राजहंस एक ‘ या एकांकिकेत लेखकाने अलीकडच्या काळातील तरुण शेतकऱ्याच्या मानसिकतेचा वेध घेतलेला आहे. एकटेपणाची वेदना सहन करणाऱ्या एका शहरी मध्यमवर्गीय वृद्ध जोडप्याची व्यथा ‘ प्रस्थान उर्फ एग्झिट ‘ या एकांकिकेत अनुभवायला मिळेल ..याचे लेखक मकरंद साठे असून दिग्दर्शक आलोक राजवाडे आहेत.
या महोत्सवात प्रवेश निःशुल्क आहे. नाट्यरसिकांनी महोत्सवास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ साहित्य संघाने केले आहे.