मातोश्री’ बाहेर घातपाताचा कट, …

0

मुंबई MUMBAI : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला असून त्यात उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree) घातपात केला जाणार असल्याचा दावा करण्यात आलाय. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे चार ते पाच लोक मातोश्रीबाहेर घातपात करण्याबाबत बोलत होते. आपण त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावा माहिती देणाऱ्या या इसमाने केला असून यानंतर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणारे 4 ते 5 जण उर्दूत बोलत होते, अशी माहिती कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे. त्याचं संपूर्ण संभाषण ऐकल्याचा दावाही नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीनं केला आहे.

महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता. या व्यक्तीने माहिती दिली की, मुंबईच्या भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्याने घेण्याबाबतही ते लोक बोलत होते. या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या फोनबाबत भाष्य करताना सांगितले की, फोन करणारे कोणते तरुण होते, हे मला माहिती आहे. राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते. त्यांनी मुस्लिम नावे घेतली होती आणि राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. या देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी अशाप्रकारे धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरे जायचे, हे भाजपचे कारस्थान आहे. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे कारण महाराष्ट्रात डाऊटफुल्ल सरकार आहे. महाराष्ट्रातील सरकार सूडाने पेटलेले सरकार आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाचे संरक्षण, शिवसेना नेत्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात काही घडले तर याची संपूर्ण जबाबदारी केंद्र आणि महाराष्ट्राच्या गृहखात्याची असेल, असेही ते म्हणाले.