शिंदे गटातील आमदाराची साडेसात कोटींनी फसवणूक

0

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सरनाईक यांच्या घोडबंदर येथील एका जमिनीच्या व्यवहारात फसवणुकीचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी एका व्यक्तीला संपर्क केला होता. सरनाईक यांनी जमीनीच्या व्यवहारासाठी ७ कोटी ६६ लाख रुपये दिले होते. मात्र, त्या व्यक्तीने जमीन नावावर केली नाही आणि पैसे देखील परत केले नाहीत. २०२१ पासून या व्यवहारासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत. संबंधीत आरोपीने टाळाटाळ केल्याने सरनाईक यांनी अखेर त्यांच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून पोलिसांत तक्रार दिली. आता काशीमीरा पोलिसांनी मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे.