
नागपूर (Nagpur) – सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड आणि थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त “हिरकणी” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक स्मृती सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी सौ. सरोज अंदनकर यांना मान्यवरांच्या हस्ते “हिरकणी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले, “हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यामुळे माझ्या कार्याला नवीन उर्जा मिळेल. हा गौरव माझ्यासाठी आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.”
या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्ष मा. डॉ. स्मिता मेहेत्रे, मा. सौ. उज्वला पाटील, मा. सौ. प्रणोती कळमकर, मा. सौ. विद्या सुरकर, मा. सौ. शीतल बनसोड आणि मा. सौ. नंदा सोनुले यांची उपस्थिती होती. सौ. सरोज अंदनकर यांनी संस्थेच्या कार्यकारिणी व निवड समितीचे आभार मानले.