चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर

0

 

 

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर, सचिवपदी प्रविण बतकी यांची निवड

 

(Chandrapur)चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या आज दि. 17 जानेवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत 2023-24 या वर्षासाठी नविन कार्यकारिणी निवडणूक पार पडली. यात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत विघ्नेश्वर यांची निवड करण्यात आली. (Vice President Yogesh Chindhalore)उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे, (Secretary Praveen Batki)सचिव प्रवीण बतकी, (Organization Secretary Balu Ramteke)संघटन सचिव बाळू रामटेके, सहसचिव एजाज अली, (Treasurer Suresh Verma)कोषाध्यक्ष सुरेश वर्मा, कार्यकारिणी सदस्य रोशन वाकडे, (Prashant Devtale)प्रशांत देवतळे,प्रकाश देवगडे, सुनिल बोकडे, संदिप पाचभाई यांची निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून (Prof. Dr. Yogeshwar Dudhapachare)प्रा. डॉ . योगेश्वर दुधपचारे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष संजय तुमराम, मजहर अली,आशिष अंबाडे,महेंद्र ठेमस्कर,पंकज मोहरील,देवानंद साखरकर,कमलेश सातपुते यांच्या सह संघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले.