आता ‘राष्ट्रवादी’ च्या निकालाची प्रतीक्षा!

0

(Mumbai)मुंबई-शिवसेना पक्ष तसेच आमदार अपात्रतेबाबत निर्णयानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे आता राष्ट्रवादी कोणाची याबाबात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. या दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर ३१ जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह कोणाचे याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीसाठी वेळापत्रकही तयार झाले असून २० आणि २१ जानेवारीला अजित पवार तर २२ आणि २३ जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी होणार आहे. (NCP MLA disqualification case)

राष्ट्रवादी आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेय. २० आणि २१ जानेवारीला अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. तर २२ आणि २३ जानेवारीला शरद पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. १६ दिवस साक्ष ते उलटतपासणी झाल्यानंतर अंतिम निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ पर्यंत निर्णय येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या निर्णयासाठी शिवसेनेच्या आमदारांसदर्भात देण्यात आलेला निर्णय मार्गदर्शक ठरु शकेल, असे सांगण्यात येत आहे. कारण दोन्ही राजकीय घटनाक्रमांमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर दोन गट वेगळे झाले. त्यापैकी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे.