सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या टपाल तिकिटाचे विमोचन

0

 

बुलढाणा BULDHANA – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राजमाता जिजाऊ  Rajmata Jijau stamp release यांच्या जयंती निमित्त वनमंत्री Sudhir Mungantiwar  सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच राजमाता जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

दरवर्षी राजमाता जिजाऊ यांची जयंती सिंदखेड राजा येथील त्यांचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजी जाधव राजवाडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. राजे लखोजी जाधव राजवाडा येथे पालक मंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात करण्यात आले. वाघ नखे एप्रिल- मे मध्ये येणार असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या कार्यक्रमाला आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. डॉ. संजय कुटे, आ. अँड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची‌ प्रमुख उपस्थिती होती.