(Nagpur)नागपूर– 22 जानेवारीनंतर आपल्याला राम राज्याची स्थापना करण्याची करायची आहे. रामराज्य म्हणजे ज्या राज्यात समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज तेवढाच महत्त्वाचा आहे. जेवढा पहिल्या पंगतीत बसणाऱ्या व्यक्तीचा आहे असे प्रतिपादन (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस म्हणाले,रामराज्य म्हणजे समतेचे राज्य सर्वांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समानतेच समतेचं राज्य दिलं. तीच रामराज्याची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रामराज्याची संकल्पना येत्या काळात आपल्या देशात पूर्ण होईल. आपला देश पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम देश म्हणून प्रस्थापित होईल त्याची सुरुवात 22 तारखेपासून होत आहे.
महर्षी वाल्मिकी नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं
आज प्रभू श्रीराम आपले आराध्य आहेत. ज्यांच्या चरित्रातून ऊर्जा घेतो आपले तत्व मूल्य त्यांच्यापासून सुरू होतो.भारतीय संस्कृती ज्यांच्या अस्तित्वामुळे समृद्ध झाली. प्रभू श्रीरामांना खऱ्या अर्थाने जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम महर्षी वाल्मिकी यांनी केले.सोमवारी प्रभू श्रीराम आपल्या स्थानी विराजमान होत आहे. (Prime Minister Narendra Modi)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं होणार आहे.अनुसूचित जाती मोर्चाचे अभिनंदन करतो. महर्षी वाल्मिकीची आरती केली आणि महाप्रसादाचं आयोजन केलं.