नागपूरवरील आपत्तीवरून राऊतांची टीका

0

नागपूर NAGPUR – मुसळधार पावसाने नागपूर शहराची ऐसीतेसी केल्यावर आता विरोधकांनी नागपूरच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात केली आहे. (MP Sanjay Raut) ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका (DCM Devendra Fadnavis) करण्याची संधी सोडली नाही. अवघ्या चार तासांच्या पावसात अख्खे नागपूर वाहून गेले व हाच तुम्ही केलेला विकास आहे का?, असा सवाल खासदार राऊतांनी उपस्थित केला आहे.
खासदार राऊत यांनी दावा केलाय की, नागपुरात पावसाने प्रचंड नुकसान केले आहे व हजारो घरांचे नुकसान झाले आहे. लोकांची घरे, बंगले, झोपड्या पाण्यात गेल्या. फडणवीस हे स्वत:ला नागपुरचे सुपुत्र मानतात. नागपुरात पावसाचा धुडगूस सुरु असताना फडणवीस हे देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शनात अडकले होते.

त्यांच्यावर टिका झाली तेव्हा ते नागपुरला गेले, असा दावाही राऊतांनी केलाय. आम्हाला मुंबई सांभाळता येत नाही, अशी टीका सातत्याने भाजपकडून केली जाते. त्यानंतर आपण नागपूरमध्ये बदल घडवला आहे, अशी टीमकीही भाजपकडून वाजवली जाते. खरे तर आता टीकाटिप्पणी करण्यात काही अर्थ नाही. आपत्ती व्यवस्थापनात सरकार नागपूरमध्येच पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.