मान्सूनचा परतीचा प्रवास अखेर सुरु

0

मुंबई MUMABI  : राज्याच्या काही भागात दुष्काळसदृष परिस्थिती असतानाच हवामान विभागाने आता मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे म्हटले आहे. (Monsoon-2023) आता नैऋत्य मान्सूनची माघार सुरु झाल्याचे ट्विट हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरु झाला आहे.दरवर्षी साधारणपणे १७ सप्टेंबरपासून ही सुरुवात होते. मात्र, यंदा २५ सप्टेंबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु असतो, असेही सांगण्यात आले.
हवामान विभागाने यापूर्वीही २५ सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. नैऋत्य मान्सून सामान्यपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, त्यानंतर ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.