नांडोरा – ठाणा मार्गावर धक्कादायक घटना ;

0

 रस्त्यावर सापडला मृतदेह

भंडारा – जवाहर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नंदोरा परिसरात नांडोरा – ठाणा मार्गावर आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास एका तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. सदर तरूणाचा खून करुन मृतदेह तिथे फेकून आरोपी पसार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी जवाहर नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदनी केली असुन घटनास्थळी पोलिस अधीक्षक लोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखदे, ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसात जवाहर नगर पोलीस स्टेशन अंतर्गत खुनाच्या तीन घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.