पुलवामा प्रश्नावरून घोषणाबाजी
अमरावती. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमोरा-समोर आले. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही् पक्षाच्या. कार्यकत्यांशमध्येू बाचाबाचीदेखील झाली. पण, पोलिसांनी वेळीच हस्त क्षेप करून भाजयुमोच्या् कार्यकर्त्यां ना आवर घातल्याने परिस्थिती निवळली. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेसंदर्भात मुलाखती दरम्यान उपस्थितीत केल्या दाव्यावरून देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुलवामा घटनेचे सत्य बाहेर यावे, या मागणीसह भाजप सरकारचाविरोध दर्शविण्यासाठी काँग्रेसकडून सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’, आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला जाईल, असे काँग्रेसच्याश वतीने जाहीर करण्या त आले होते. त्यानुसार जिल्ह्या चे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्याय नेतृत्वाात शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्हातधिकारी कार्यालयासमोर जमले होते. घोषणाबाजी सुरू असतानाच भाजयुमोचे कार्यकर्ते देखील पोहोचले. त्यानीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
भाजयुमो- काँग्रेस कार्यकर्त्यांकडून परस्परविरोधी घोषणा दिल्या जात होत्या. दोन्हीह बाजूंकडून घोषणाबाजी होत असताना पोलिसांनी मध्येँ कठडे लावून कार्यकर्त्यांरना रोखून धरले. यांनंतरही रोष वाढत गेला. पोलिसांना मध्यस्थी करून भाजयुमो कार्यकर्त्यांना आवर घालावी लागली.
यावेळी देशमुख यांनी सांगितले की, पुलवामा घटना ही सरकारची चूक आहे, असे सत्यपाल मलिकांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने दिलेली नाहीत. पुलवामा घटनेवर सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारची झोप उडवल्याने या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा भाजप सरकारने कितीही प्रयत्न केला तरी जनता त्यांच्या षडयंत्राला बळी पडणार नाही.
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याज नेतृत्वातत इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याम पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्यार विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्याइत आले. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाा अध्य्क्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप उपस्थित होते.