
जालना JALNA -मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे Manoj Jarange यांना भेटून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरुच असताना जरांगे यांनी सरकारवर आरोप केले आहे. “आपल्याला गोळ्या घातल्या, तरी आता मागे हटणार नाही. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे”, असा आरोप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केला. या मंत्र्यांची नावे उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याची घोषणा त्यांनी केलीय.
जरांगे यांनी सांगितले की, मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काहीतरी कारस्थान रचत असल्याची मला माहिती आहे. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा नाही. मी खोलात जाऊन हे खरं आहे का? याची माहिती घेत आहे. मी सरकारला मॅनेज होत नाही आणि फुटत देखील नाही. मी आरक्षणाचा मुद्दा संपवायला निघाल्याने या लोकांना खूप वाईट वाटत आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.