Home Breaking news इराण-इज्रायल युद्धात कोण जिंकलं, कोण हरलं?

इराण-इज्रायल युद्धात कोण जिंकलं, कोण हरलं?

0

कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

इराण अमेरिका/इस्रायल युद्धात ०८०४२०२६ला दोन आठवड्यांची तात्पुरती युद्धबंदी इराण व अमेरिकेनी, इराणच्या पाकिस्तान मार्फत पेश केलेल्या १० पॉईंट शर्थींवर, मान्य केली. इस्रायलनी देखिल,लेबनानचा मुद्दा सोडून ती मान्य केली. दुनियाभरात यामुळे डोनाल्ड ट्रम्पची नाचक्की/थूथू झाली.

काहींनी तर अमेरिका हरली, इराण जिंकल असा घोषही केला. ट्रम्पच्या, सो कॉल्ड बेबाक/मूर्ख/बेताल/बालिश/पोच नसलेल्या, वक्तव्यांनी बऱ्याच लोकांच मनोरंजन ही केल.पण खर तर त्यांना ट्रम्पचा स्वभाव कळलाच नाही अस माझ मत आहे. बहुतांश विचारवंतांच्या हे पचनी पडणार नाही/त्यांना आवडणार नाही.
ट्रम्प हा एक हाडाचा व्यापारी आहे.”मेक अमेरिका ग्रेट अगेन: मागा ” हे त्याच ब्रिद वाक्य आहे आणि ते त्याचनुसार वागला आहे. मागील वर्षाच्या शेवटच्या क्वार्टरपासूनच त्यांनी इराण विरोधात राळ उडवण सुरू केल.”जर आमच्या अटी मान्य केल्या नाहीत तर, इस्रायल व अमेरिका इराणला संपवणार ” अस म्हणत त्यांनी तीन अटी घातल्या.इराणनी मान्य केल्या नाहीत.मग वाटाघाटी सुरू झाल्या.त्या सुरू असतांनाच त्यांनी,”नेतन्याहू व मी इराणवर हल्ला करणार” अस म्हणत त्यांनी धमकावण व आक्रमणाच्या तारखा जाहीर करण सुरू केल.अनेक तारखा व वेळी बदलल्या.लोकांनी त्याला वेड्यात काढण,त्याची थट्टा उडवणं सुरू केल. “लांडगा आला रे आला” या उक्तीनुसार,इराणही गाफील होत गेला.नंतर २८ फेब्रुवारी २६ ला त्या दोघांनी इराणवर अकस्मात हल्ला करुन एका झटक्यात त्याचे सर्वेसर्वा धर्मगुरू आणि ४१ लष्करी अधिकाऱ्यांना अल्ला प्यारे केल.वेड्या हरकती करत ट्रम्पनी मारलेला हा सुंदर मनोवैज्ञानिक षटकार होता.त्यानंतर तुंबळ युद्ध सुरू झालं.

इराणविरुद्ध होत असलेल्या या युद्धात एक अमेरिकेची विन विन पोझिशन आहे.कशी याचा खुलासा करतो.माझ्या मते याची मुख्य कारण; एक) इराण,इस्रायल व आखाती देशांमधील संसाधनांच प्रचंड,अब्जावधी डॉलर्सच,नुकसान झाल आहे. अमेरिकेची दोन विमानवाहू जहाज,दोन डिस्ट्रॉयर्स,आठ फायटर्स, एक ॲवॉक,तीन ट्रान्सपोर्टर्स, चार हॉलिकॉप्टर्स आणि बऱ्याच मोठ्या संख्येनी ड्रोन्स,१९ मिलिटरी बेसेस आणि तेरा सैनिक व दोन वैमानिक;इस्रायलची ४८ विमान,दोन रिफायनरी, एक बंदर, तीन विमानतळ आणि ६० वर नागरिक; इराणच्या दोन रिफायनरीज,सर्व विमान व लढाऊ जहाज,ड्रोन्स व १७०० वर नागरिक; आखाती देशांच्या चार रिफायनरीज,तीन बंदर,चार विमानतळ,१९ पाश्चिमात्य बेसेस आणि ७० वर नागरिक क्षतिग्रस्त झालेत.इराण,इस्रायल व आखाती देशांमधील प्रचंड मोठी संसाधन नष्ट झालीत.; दोन) आखाती देश,अमेरिका व इस्रायलचे जवळपास सर्व इंटरसेप्टर क्षेपणास्त्र संपलेत व एयर डिफेन्स सिस्टिम्स निष्क्रीय झाल्यात.इराणची दुय्यम दर्जाची क्षेपणास्त्र संपली पण प्रथम दर्जाची असंख्य क्षेपणास्त्र व असंख्य ड्रोन्स अजूनही शिल्लक आहेत. त्याच्या स्वतःच्या व चीनी एयर डिफेन्स सिस्टिम्स नष्ट झाल्यात पण युद्ध सुरू असतांनाच, रशियानी सहा एस ४००/५०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स आणि उत्तर कोरियानी काही शे क्षेपणास्त्र दिली आहेत; तीन) युद्ध बंदीच्या १५ पॉईंट अमेरिकन मसुद्याला इराणनी सपशेल नाकारून आपला दहा पॉईंट मसुदा मांडला आणि आता चर्चा त्यावरच होईल; चार) इस्रायल व आखाती देशांमधील संसाधनांची पुनर्रचना/ पुनर्बांधणी अमेरिकन कंपन्या करतील,पैसा अमेरिकेकडेअमेरिकेमध्ये जाईल,फायदा अमेरिकेचा होईल.

इराणला चीन व रशिया मदत करतील;पाच) अमेरिका/इस्रायल/आखाती देशांमधील संपलेल्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्या तयार करतील, तेथील हत्यार उद्योगाला प्रचंड चालना मिळेल, बेरोजगारी कमी होईल. फायदा अमेरिकेचा होईल; सहा) इस्रायल व आखाती देशांमधील नष्ट झालेल्या अमेरिकन सिस्टिम्स अमेरिकेतच परत तयार होतील आणि त्यांना विकल्या व तेथे परत बसवल्या जातील. फायदा अमेरिकेचा होईल; सात) इराणमधील नष्ट झालेली संसाधन, नागरी व लष्करी नुकसान अमेरिका/ इस्रायलनी भरून देण्या ऐवजी अमेरिका इराणला,प्रति जहाज दोन बिलियन डॉलर्स हार्मोझ टोल टॅक्स घेण्याची परवानगी/मुभा/सहुलियत देईल. यात अमेरिकेच काहीही नुकसान होणार नाही. टोल टॅक्स आखाती देश आणि तेल मागणारे देश देतील. इराण अमेरिकेची चांदी आहे. भुर्दंड इतर देशांना पडेल. तसही ट्रम्पनी म्हटल आहे की टोल टॅक्स अमेरिका व इराण मॅनेज करतील; आठ) अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील बेसेस कायम राहतील.शिया बहुल इराण, सुन्नी बहुल आखाती देशांवर भारी पडेल. मुस्लिमांमधील शिया सुनी विवादाला भडकवण्याची अमेरिकन इच्छा पूर्ण होईल; नऊ) इराण यापुढे अमेरिकेला तंग करणार नाही आणि अमेरिका इराणला तंग करणार नाही; दहा) इराणची वट वाढली आणि अमेरिकेची कमी झाली या भ्रमात जग आणि त्यातील विचारवंत राहतील,अखंड साधकबाधक चर्चा होतील पण त्या दोघांना याचा काहीच फरक पडणार नाही; अकरा) पुढील सहा महिन्यात अमेरिकेची अर्थ व्यवस्था उभारी धरेल आणि ट्रम्प/रिपब्लिक्न्स नोव्हेंबर इलेक्शन मोठ्या मेजॉरिटीनी जिंकतील; बारा) मुस्लिम राष्ट्रांमधे पाकिस्तानची वट वाढेल. पाकिस्तान अमेरिकेच्या गुड बुक्समधे जाईल. त्याला अमेरिकन वित्तीय व लष्करी मदत परत मिळू लागेल. उत्तर अफगाणिस्तानमधील बारगाम एयर बेस घेण्यात तो अमेरिकेची मदत करेल. बदल्यात अमेरिकेला रशिया चीनवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या जवळ जागा उपलब्ध होईल. पाक दृष्टीकोनातून अफगाणिस्तानची परस्पर खच्ची होईल; तेरा) भारतावर याचा असर पडेल. लष्करी दृष्ट्या सुदृढ पाकिस्तान भारतातील मुसलमानांना भडकावून परत भारताशी छद्म युद्ध सुरू जरी; चौदा) ट्रम्प संयुक्त राष्ट्रसंघ आणि नाटो संघटनेमधून बाहेर पडेल;पंधरा) जगातील पॉवर प्लेवर याचा असर होईल. जगात मल्टी पोलर सिस्टीम कार्यरत होतील.

भारताची भूमिका अतिशय संयत होती. आपण ना अमेरिकेला दुखावल, ना इराणला, ना इस्रायलला. यात आपल्याला भरपूर रशियन तेल मिळाल, ईराणनीही भारताला तेल दिल.इराणमधील संसाधन पुनर्रचनेत भारताला सहभागी करण्यात येईल करण इतर कोणीच ते करू शकणार नाही/इराण ॲक्सेप्ट करणार नाही.त्यामुळे इराण अमेरिकेनी पाक मध्यस्ती मंजूर केल्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली हा विरोधी पक्षांचा आरोप मिथ्या ठरेल/ठरतो.
तज्ञांचे मत व सामरिक/आर्थिक/राजकीय दृष्टीकोनातून वैचारिक चिरफाड सादर आमंत्रित/अपेक्षित आहे.जय हिंद!

 

#IranIsraelConflict #MiddleEastWar #Geopolitics #GlobalPolitics #IranVsIsrael #USForeignPolicy #DonaldTrump #WarAnalysis #Ceasefire #DefenseAnalysis #StrategicAffairs #WorldNews #IndiaForeignPolicy #PakistanRole #RussiaChina #MilitaryStrategy #InternationalRelations #GlobalPowerShift #WarInsights #ShankhnaadNews