मुख्यमंत्र्यानी भुजबळांची हकालपट्टी करायला हवी -संजय राऊत

0

मुंबई- उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. दोन दिवस ते पूर्णपणे कोकणच्या दौऱ्यात असतील त्यांचा कार्यक्रम संपूर्ण आला आहे. आणि कोकणची जनता उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा करत आहे. धमक्यांची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकणचा दौरा हा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसार होईल. मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक असून राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत कसे सहभागी झाले. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे ओबीसी किंवा इतरही कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला मिळू नये. छगन भुजबळ यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे.मात्र, त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये इतका टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीने जातीवादाच्या खाली ढकलला जात आहे, हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधी आहेत.

जेव्हा मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणतरी भूमिका घेत तेव्हा त्याला मंत्री मंडळातून बरखास्त केलं जातं. ही आतापर्यंतची परंपरा आहे असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. अडवाणी यांच्याबरोबरच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे , स्वातंत्र्यवीर सावरकर याची मागणी आम्ही केली होती. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार पदव्यांची खिरापत वाढवते. यावेळी पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारमध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आहेत. किंवा संघ परिवारामधील लोक आहेत. लालकृष्ण अडवाणी नसते, त्यांनी राम रथ यात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आता भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता. भाजप पक्ष दोन खासदारांमध्ये होता तो आता 300 पार झाला आहे. तो आडवाणी मुळे झाला आहे. अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली. वारंवार त्यांनी अबकी बार अटल बिहारी ही घोषणा दिली. प्रधान मंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर सारले गेले. राष्ट्रपती पदाचा तरी सन्मान त्यांना द्यायला हवा. राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मग ठाण्याचं असेल डोंबिवलीच असेल मलबार हिल्स असेल साताऱ्याचा असेल तर प्रत्येक ठिकाणी गुंड, माफियांना खत पाणी घालण्याचं काम सुरू आहे.अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना तिकडे कामाला लावले आहे. मी पुराव्यासह माहिती देईन. मुख्यमंत्री कार्यालयातून गुंड्यांना मदतीसाठी फोन केले जातात. पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात.

गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही. पण या राज्यात काय चालू आहे, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याचा उद्रेक आणि स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झाला आहे. आमदार सांगत आहे मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलं आहे. त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे. पोलिसांनी घेतली पाहिजे आर्थिक गुन्हे शाखेने देखील घेतली पाहिजे. गायकवाड बोलत आहेत माझे कोट्यावधी रुपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत आणि शिंदे यांनी आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं हे कोट्यावधी रुपये गायकवाड यांनी शिंदे यांच्याकडे का ठेवले गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले कोणत्या व्यवहारातून मिळाले आणि शंभर कोटी पेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदे यांच्याकडे कशा करता ठेवलेली आहे. त्या रकमेच्या पुढे काय झालं मला असं वाटतं ईडी सीबीआय तपासाचा हा विषय आहे.

सरळ सरळ मनी लॉन्ड्रीग ची केस आहे जर हिम्मत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शहा गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपाची चौकशी केली पाहिजे. फडणवीस म्हणत आहेत चौकशीचे आदेश दिले म्हणजे काय केलं ? आमदार पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग करतो आणि तुम्ही चौकशीचे आदेश देत आहात कोणाला मूर्ख बनवत आहात ? तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड कोट्यावधी रुपये शिंदे यांच्याकडे ठेवले आहेत. कोणता पैसा आहे हा फडणवीस सांगा तुम्ही समोर येऊन हिम्मत असेल तर, नाही तर आम्ही सांगतो पैसा कुठून आला कोणाचा आहे .आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे. खून बलात्कार हे शिंदे यांच्या नावाने सुरू आहेत.

 

 

नाश्त्यात झटपट बनवा बाजरीची लापशी | Shankhnaad News #shankhnaadnews #live